जळगावात रेल्वे स्थानकाबाहेर महिलेवर सुरीने हल्ला


Woman attacked with knife outside railway station in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गाडी पार्किंग करण्याच्या वादातून महिलेला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली व नंतर तिच्यावर सुरीने वार करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी मंगळवार 30 मे रोजी रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून मारली सुरी
सरला अनिल चौधरी (42, अयोध्या नगर, जळगाव) ही महिला हातमजुरी करते. रविवार, 28 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास महिलाही कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वे स्टेशन जवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आल्या होत्या. त्यावेळी गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून विकास अभिमान पवार (35, तेली चौक, जळगाव) या तरुणाने महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने हातातील सुरीने महिलेवर वार करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी विकास अभिमान पवार यांच्या विरोधात मंगळवार, 30 मे रोजी रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश भांडारकर करीत आहे.


कॉपी करू नका.