वॉटर पार्क कर्मचार्‍यांची तरुणाला मारहाण : शुटींग करीत असल्याच्या संशयातून प्रकार


Youth assaulted on suspicion of shooting: Crime against four जळगाव : कुटुंबासोबत वॉटर पार्क परीसरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणासह कुटूंबियांची चौघा कर्मचार्‍यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. ही घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क येथे घडली. चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ झुलेलाल वॉटर पार्क असून आर्यन प्रितेश भावसार (19, भवानी पेठ, आठवडे बाजार, जळगाव) हा तरूण आपल्या परीवारासह सोमवार, 29 मे रोजी रात्री दहा वाजेच्या फिरण्यासाठी आला असता परीसरातील शुटींग करत असल्याच्या संशयावरून आर्यन भावसार याला येथील काम करणारे अनोळखी चार कर्मचार्‍यांनी जाब न विचारता मारहाण करून त्याचा कॅमेरा फेकून दिला तसेच त्याच्या सोबत असलेले महिला व मुलींना देखील शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर आर्यन भावसार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !