जैनाबाद परीसरातील तरुणाला तापी पात्रातच आले फिट अन् गाठले मृत्यूने
A young man in Jalgaon died after getting fit while swimming जळगाव : तापी पात्रात पोहत असताना फिट आल्याने जैनाबाद परीसरातील रवींद्र कोळी या सेंट्रींग काम करणार्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता धामणगाव गावाजवळील नदीपात्रात घडली.
पोहताना आले फिट
सोमवार, 29 मे रोजी रात्री धामणगाव येथे रवींद्र हा मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रवींद्र हा मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला मात्र तो एकटाच पाण्यात पोहत असताना अचानक त्याला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी नदीपात्राच्या दुसर्या तिरावर असलेल्या काही जणांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरोळी मारुन त्याच्या मित्रांना रवींद्र बुडत असल्याचे सांगितले. त्यांनी लागलीच रवींद्रला पाण्यात बाहेर काढले. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई आहे. य ाघटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार लोखंडे करीत आहे.


