काय सांगता जिल्ह्यात पाचशेच्या बनावट नोटा चलनात : पारोळ्यात बँकेची झाली फसवणूक


The bank was defrauded in Parola पारोळा : बनावट पाचशेच्या नोटा खर्‍या असल्याचे भासवून बँकेत सीडीएम मशिनद्वारे जमा करणार्‍या एकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजू आत्माराम पाटील (रा.चोरवड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मशीनने पकडली चोरी
सोमवार, 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राजु पाटील हा त्याच्याकडील बनावट पाचशे रुपये दराच्या सहा नोटा एचडीएफसी बँकेच्या सीडीएम मशिनद्वारे जमा करत होता परंतु मशीनच्या माध्यमातून तपासल्या असता त्या नोटा बनावट आढळून आल्या. या प्रकरणी जिंतेंद्र किशोर खरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक योगेश जाधव करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !