नाशिकमध्ये केली चोरी, संशय न येण्यासाठी अमळनेरात मजुरी मात्र यंत्रणेनेच अखेर आरोपीला गाठले
Amalner police handcuffs a thief who stole from a temple in Nashik अमळनेर : नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरात चोरी केल्यानंतर कारवाई टळण्यासाठी अमळनेरात मजुरी करणार्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. किशोर चव्हाण (नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चोरीनंतर आरोपी अमळनेरात
नाशिकच्या पंचवटीतील सप्तश्रुंगी मदिरात 26 मे 2023 रोजी चोरी झाली होती. यात चोरट्याने मंदिरातील पादुका चोरी करीत अटकेच्या भीतीने अमळनेर गाठत मजुरीने कामास सुरूवात केली. अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. अमळनेर शहरातील विश्वकर्मा मंदिरा शेजारी मजुरी कामासाठी आलेला नाशिक येथील किशोर चव्हाण नामक अट्टल चोरटा असून त्याने नाशिकमध्ये चोरी केल्याचे कळताच पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. भटूसिंग तोमर, मिलिंद भामरे, सुनील हटकर, कपिल पाटील, जितेंद्र निकुंभे यांना आरोपीला बुधवारी रात्री अटक केल्याने त्याने नाशिक येथील सप्तशृंगी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. नाशिक पंचवटी पोलिसांना आरोपीला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीचा ताबा घेतला.


