जळगावात स्टेट बँकेत भरदिवसा दरोडा : आरोपींच्या अटकेसाठी भुसावळसह यावलमध्ये नाकाबंदी


Robbery in Jalgaon : Even in the blockade, the robbers did not survive in the district भुसावळ : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परीसरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सकाळच्या सुमारास पडलेल्या धाडसी दरोड्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चॉपरद्वारे मॅनेजरवर हल्ला करीत दरोडेखोरांनी तीन कोटी 60 लाखांचे सोने तर 17 लाखांची रोकड लांबवल्यानंतर भुसावळसह यावल रावेर व बोदवडमध्ये संशयिताच्या शोधार्थ नाकाबंदी लावण्यात आली मात्र संशयित गवसले नाहीत.

यावलमध्ये कसून तपासणी
गुरूवारी यावल येथे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर तातडीने नाकाबंदी करण्यात आली. येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली व काही नियम मोडणार्‍या वाहनांवर कारवाईदेखील करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत नाकाबंदी कायम होती. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, संजय देवरे, मोहन तायडे, जाकीर तडवी, युनूस तडवी, मुस्तुफा तडवी, संजय साळुंके, जनार्दन महाजन आदी पोलीस कर्मचार्‍यांनी यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर -बर्‍हाणपूर राज्य मार्गावर भुसावळ टी पॉइंन्ट जवळ नाकाबंदी केली. येणार्‍या जाणार्‍या छोट्या-मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. यात नियमबाह्य पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या काही वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. दिवसभर यावल शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी व वाहन तपासणी सुरूच होती.

भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर नाकाबंदी
भुसावळ :
जळगाव एसबीआय शाखेत दरोडा टाकून पसार झालेले संशयित भुसावळकडे येण्याची शक्यता गृहित धरून रेल्वे स्थानकाबाहेर तसेच शहरातील अन्य भागात नाकाबंदी लावण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलिसांकडून छोट्या-मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांची चौकशी करण्यात आली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. येणार्‍या-जाणार्‍या दुचाकीचे क्रमांक पडताळून पाहण्यात आले तसेच पोलिसांना मिळालेल्या वर्णनाद्वारे संशयितांची चाचपणी यावेळी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !