आधी फेसबुकवरून निर्माण केली ओळख नंतर लग्नाच्या आमिषाने जळगावातील तरुणीवर अत्याचार


Rape of a girl who was Facebook friend in Jalgaon जळगाव : जळगावातील एका भागातील 25 वर्षीय तरुणीशी फेसबुक या सोशल मिडीया साईटवरून ओळख झाल्यानंतर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत सलगी वाढवली व नंतर तरुणीवर अत्याचार केला तर नंतर पुन्हा तरुणी घरी एकटी असताना आरोपीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने तरुणीसोबतचे काढलेले फोटो व्हायरलची धमकी देत पुन्हा तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संशयित ऐजाज इंद्रिस खाटीक (पत्ता माहित नाही) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओळखीतून सलगी वाढवत अत्याचार
25 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2022 तसेच 1 मे रोजी ऐजाज खाटीक याने फेसबुकवर ओळख निर्माण करून प्रथम पीडीता घरी एकटी असतांना तिच्या घरी येवून पीडीतेस लग्नाचे आमीष दाखवत अत्याचार केला तर दुसर्‍या वेळी पीडीता घरी एकटी असतांना तिच्या राहते घरात घुसून इच्छेविरुद्ध फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी ऐजाज खाटीकविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली महाजन करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !