चाळीसगावसह नाशिकमध्ये दुचाकींची चोरी : संशयित भडगाव पोलिसांच्या जाळ्यात
Two-wheeler theft in Chalisgaon and Nashik: Suspect in Bhadgaon police net भडगाव : भडगाव तालुक्यातील गुढे येथील शेतकर्याची कडबा कुट्टी व इलेट्रीक मोटार चोरीला गेल्यानंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी चके्र फिरवून संशयिताना ताब्यात घेतले मात्र संशयितांनी चाळीसगावसह नाशिकमध्ये दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या तर संशयितांना अटक करण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
भडगाव तालुक्यातील गुढे येथील शेतकरी दिलीप देवीदास पाटील यांच्या शेतातून कडबा कुट्टीसह मोटार चोरीला गेल्ली. भडगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चोरी प्रकरणात गुढ्यातील काही संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिल ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदिप रणजित कोळी, संतोष नाना महाले (सर्व रा.गुढे) व समाधान संतोष ढोले (बहाळ, ता.चाळीसगाव) अशांना ताब्यात घेतल्यानंतर संशयिताकडे दिलीप देवीदास पाटील (गुढे) यांची लांबवलेली दुचाकी मिळाली तर तपास करताना ना गुढे गावातील आणखी काही संशयितांकडे चोरीच्या मोटार सायकल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली.
चोरीच्या तीन दुचाकी जप्त
पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पांडुरंग सोनवणे, निलेश ब्राम्हणकर, पोना एकनाथ पाटील यांनी गुढे गावातील संशयित इसम भूषण (प्रशांत) ज्ञानेश्वर महाजन, भूषण अनिल भावसार (सर्व रा.गुढे) यांनी संतोष नाना महाले याच्यासोबत नाशिकसह चाळीसगाव येथे मोटारसायकलची चोरी केल्याची बुली दिली. होंडा कंपनीची युनिकॉर्न व दोन बजाज प्लॅटीना पोलिसांनी जप्त केल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पांडुरंग सोनवणे, निलेश ब्राम्हणकर, एकनाथ पाटील यांनी केली आहे. पुढील तपास नाईक एकनाथ पाटील करीत आहे.


