नगरदेवळ्यात जुगाराचा डाव उधळला : 15 जुगारी अटकेत


पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे जुगार सुरू असल्याची माहिती यंत्रणेला कळताच गोपनीय पद्धत्तीने छापेमारी करीत 15 संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईने जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्यानंतर पथकाने शनिवार, 3 जुन रोजी नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत 15 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 95 हजार 280 रुपयांची रोकड व एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

जुगार्‍यांच्या गोटात प्रचंड खहबळ
नगरदेवळा येथील ईश्वर भंडारी यांच्या घरात पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. कॉन्स्टेबल संभाजी पाटील, विजय शिंदे, अमृत पाटील, महेश बागुल, अमोल भोसले, श्रीराम कांगणे यांच्या पथकाने धाड टाकत कपिल परदेशी, ज्ञानेश्वर फाजगे, सागर पाटील, अनिल शिंदे, फारुख कय्युब, स्वप्निल कोळी, राहुल पाटील, रामचंद्र कुर्‍हाडे, अंबू पाटील, हुसेन पिंजारी, चंदु कुर्‍हाडे, सोनु पाटील, सोनु कुर्‍हाडे, विलास जाधव, ईश्वर भंडारी (सर्व रा.नगरदेवळा), विलास जाधव (हनुमंतखेडा, ता.सोयगाव), संदीप पाटील (चुंचाळे, ता.पाचोरा) यांच्याकडून 95 हजार 280 रुपये रोख व घटनास्थळावरुन एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !