मालेगावात गोळीबार : 36 वर्षीय महिलेचा मृत्यू


मालेगाव : शहराला लागून असलेल्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (36) या महिलेवर गोळीबार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. भायगाव शिवारातील संविधाननगर भागात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. ज्योती डोंगरे बंगल्यात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून ज्योती डोंगरे यांच्यावर दोन काडतुसे झाडली. फायरींगमुळे मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या नागरीरकांना काही समजण्याच्या आत अनोळखी व्यक्तीने गल्लीतून काटेरी झुडपांकडे पळ काढला. घटनेची माहिती कॅम्प व वडनेर खाकुर्डी पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जिल्हा पोलिस प्रमुख आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शशिकांत शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत महिलेचे पती जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ज्योती डोंगरे यांचा मृतदेह पाहताच कुटुंबिय व नातलगांनी हंबरडा फोडल. या घटनेमुळे संविधाननगर भागात काहीकाळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीरा सामान्य रुग्णालयात ज्योती डोंगरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !