गर्दीत जाब विचारल्याच्या वादातून जळगावात तरुणावर हल्ला
A young man was attacked in Jalgaon due to a dispute over asking for jab in the crowd जळगाव : गर्दी का झाली? अशी विचारणा केल्याच्या रागातून तरुणावर हल्ला करीत त्याच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजता सुप्रीम कॉलनी परीसरातील ममता बेकरीजवळ घडली. य ाप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुमारे दहा जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जाब विचारताच केला हल्ला
राहुल संजय काकडे (22, नवनाथ मंदीराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) हा तरुण शनिवार, 3 जून रोजी रात्री 9 वाजता सुप्रीम कॉलनीतील ममता बेकरीजवळून जात असतांना त्याला गर्दी दिसली व त्याने काय गर्दी जमली ? असे विचारल्याचा राग येवून संशयितानी धारदार वस्तूने वार करून त्यास गंभीर जखमी केले तसेच राहुलची दुचाकी (एम.एच.19 सी.एम.8798) चे ही नुकसान केले. जखमी अवस्थेत तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. राहुल काकडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ल तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


