जळगावात ईमारतीची भिंत कोसळली : दोघांविरोधात गुन्हा
Wall of building collapsed in Jalgaon : Crime against two जळगाव : ईमारत बांधकामादरम्यान हलगर्जीपणा झाल्याने वादळी पावसात शिरसोली नाक्याजवळील सप्तशृंगी भरीत सेंटरवर इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाल्यानंतर रविवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
रविवार, 4 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तुफान वादळी वार्यामुळे पाचव्या मजल्यावरील इमारतीची भिंत कोसळल्याने खाली असलेल्या सप्तशृंगी भरीत सेंटरवर पडली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले तर राजेंद्र संजयसिंग पाटील (56, रा.नितीन साहित्य नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर इमारतीचे बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्यानंत राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालक जय जोशी आणि दीपक पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.


