चोपडा शहरातील जिनिंगमधून सव्वा आठ लाखांची रोकड लांबवली


A cash of eight and a half lakhs was extended from Ginning in Chopda city चोपडा : मध्यरात्रीच्या सुमारास चौघा चोरट्यांन चोपडा शहरातील हिरा कॉटन जिनिंगच्या कार्यालयातून आठ लाख 17 हजारांची रोकड लांबवली. अवघ्या काही मिनिटात काम फत्ते झाल्याने चोरटे हे माहितगार असल्याचा दाट संशय आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला व्यापारी सुनील तिलकचंद जैन (55, रा.टाटिया कॉम्प्लेक्स, चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास केली चोरी
चोपडा-यावल रस्त्यावर हिरा कॉटन जिनिंग असून रविवार, 4 जून रोजी पहाटे 3 वाजून 5 मिनिटांनी अज्ञात चार चोरट्यांनी जिनिंगच्या कार्यालयात उघड्या दरवाजाद्वारे प्रवेश करीत कार्यालयातील काचेच्या दरवाजेचे कुलूप तोडून कपाटातील कापूस खरेदी-विक्रीसाठी ठेवलेली आठ लाख 17 हजार रुपयांची रक्कम चोरट्याने लांबवली. डीवायएसपी ऋषिकेश रावले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !