धरणगावातील वृद्धाला बेदम मारहाण
An old man in Dharangaon was brutally beaten धरणगाव : घर नावावर करण्यासाठी वृद्धाला पाच जणांनी मारहाण केली. अशरफ खान जाबाज खान (60, रा.बेलदार मोहल्ला, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 मे रोजी रात्री साडेदहा ते अकारा वाजेच्या दरम्यान अश्पाक खान व त्याची पत्नी, मुलाचा सासरा मनसुर खान मेताप खान, मुलाची साली, मुजम्मील मन्सूर खान अशांनी त्यांच्या घरी येऊन मुलाच्या व सुनेच्या नावाने घर करून द्या नाही तर तुला जिवे सोडणार नाही, अशी धमकी दिली तर अशरफ खान यांनी मी हायात आहे तोपर्यंत घर मुलाच्या नावे करणार नाही असे सांगितल्याचा राग येवून संशयितांनी मारहाण केली.
यांनी कली मारहाण
वृद्धाचा बोलण्याचा राग येवून त्यांच्या सुनेची बहिण ही अनधिकृतपणे घरात घुसली व अशरफ खान यांची कॉलर पकडून घराबाहेर ओढून घेतले. त्यानंतर त्यांचा मुलगा अश्पाक आणि सुन, सुनेची बहिण यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली व मुलाचा सासरा मनसुन खान याने त्याच्या हातातील लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच मुलाचा शालक याने फायटरने नाका-तोंडावर दोन तीन वेळा मारले. त्यामुळे अशरफ खान यांच्या नाकास, तोंडास मार लागल्याने नाकातून व तोंडातून रक्त निघाले. त्यावेळी मुलाची साली ही घरात घुसून अशरफ खान यांची पत्नी व आई व मुलीला चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे अशरफ खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक प्रमोद पाटील करीत आहेत.


