चोपडा तालुका हादरला : सात वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीनाचा बलात्कार


Chopra taluka shaken : A seven-year-old girl was raped by a minor चोपडा : खेळण्यासाठी बोलावून सहा वर्ष 10 महिने वयाच्या अल्पवयीन बालिकेवर 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे संतापजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गच्चीवर नेत केला अत्याचार
चोपडा तालुक्यातील एका गावातील पीडीतेच्या आजीने दिलेल्या चोपडा शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार, 8 रोजी सांयकाळी 5.30 ते 6.30 वाजता संशयित अल्पवयीनाने बॉल खेळण्यासाठी चिमुकलीला बोलावत शेजारच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पत्री खोलीत नेले व तिच्यावर अत्याचार केला. . या प्रकरणी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. तपास सहापोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !