दुचाकीची चावी हरवल्याच्या वादातून जळगावात तरूणाचा खून : आरोपींची कोठडीत रवानगी


Murder of youth in Kusumba :  Seven days police custody for three accused जळगाव  :दुचाकीची चावी हरवल्याच्या वादातून कुसूंब्यातील तरुणाचा जळगावात निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अविनाश निंबा अहिरे (35, कुसूंबा) या युवकाचा मृत्यू झाल्याने संशयित दीपक प्रकाश पाटील, साहील खान रशीद खान पठाण (22) व अमोल गवई (23, रा.पिंप्राळा) यांना अटक करण्यात आली आहे.

चावीचा वाद बेतला जीवावर
खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्र महेश पोपट सोनवणे (43, जळगाव) सोबत आल्यानंतर काही वेळाने संशयित दीपक आला. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर दीपकचे मित्र साहील खान व अमोल गवई यांनी तु माझ्या मित्राला काय शिव्या देतो, असे म्हटल्यानंतर वाद आणखीनच वाढला व अविनाशने तुम्ही येथून निघा म्हटल्यानंतर याला आज जिवंत सोडू नका म्हणत संशयित दीपक व साहीलने अविनाशला पकडून ठेवले व अमोल गवई याने आपल्याकडील धारदार शस्त्राने अविनाशच्या पोटावर हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यानंतर संशयित पसार झाले तर महेश सोनवणे व राम कुकडे यांनी अविनाशला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

तिघा आरोपींना कोठडी
अविनाशच्या खून प्रकरणी महेश पोपट सोनवणे (43, चंदू आण्णा नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीवरून दीपक प्रकाश पाटील, साहील खान रशीद खान पठाण (22) व अमोल गवई (23, रा.पिंप्राळा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताना बुधवारी जळगाव सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !