कुरीयर पार्सल अडकण्याच्या बहाण्याने जळगावातील वकिलांची 42 हजारात फसवणूक


Lawyers in Jalgaon were defrauded of 42,000 on the pretext of getting the courier parcel stuck जळगाव : कुरीयरमध्ये पार्सल अडकल्याच्या बहाण्याने टेक्स मेसेज करून जळगावच्या वकिलाची सुमारे 42 हजारात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
निखील विजय भोलाणे (34, जळगाव) हे वकील असून न्यु बी.जे.मार्केटमधील फ्लॅटमधून त्यांचे कामकाज चालते. त्यांना कुरीयरचे पार्सल अडकून पडले असल्याचे टेक्स मॅसेज आल्यानंतर त्यांनी लिंकवर क्लीक करताच त्यांच्या बँक खात्यातून 41 हजार 497 रुपयांची रक्कम वळती करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. भोलाणे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार नोंदवली. तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !