आर्थिक विवंचनेतून 52 वर्षीय प्रौढाचा गळफास : वासरे गावात शोककळा


52-year-old hanged due to financial exploitation : Mourning in Vasare village अमळनेर : अमळनेर तालुक्यातील वासरे येथील 52 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. भागवत प्रकाश पाटील (52) असे मयताचे नाव आहे.

लिंबाच्या झाडाला गळफास घेत संपवले जीवन
पाटील यांनी खेडी शिवारातील गावाबाहेर स्मशानभूमीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना 9 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावातील दीपक पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान भागवत पाटील यांनी व कुटुंबाने काही दिवसांपूर्वी दोन बिघे शेत विकून बँक कर्जाची फेड केली व याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परीवार आहे. तपास हवालदार मुकेश साळुंखे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !