पिंपळगाव विद्यालयात इलेक्ट्रीक शॉर्टसर्किटने आग : पुस्तके खाक
भडगाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होवून पुस्तकांना आग लागल्याची घटना 7 ते 8 जूनच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी भडगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
पोलिसात अकस्मात आगीची नोंद
माध्यमिक विद्यालयाचे क्लार्क शीतल अशोक गायकवाड (39) यांनी भडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 7 ते 8 जूनदरम्यान शाळेतील मुख्याध्यापकांच्या दालनात इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होवून पाचवी ते आठवीची जुनी पुस्तके तसेच माध्यमिक विद्यालयास जिल्हा परीषदेकडे प्राप्त टपाल, कर्मचार्यांच्या शैक्षणिक पात्रता असलेल्या कागदपत्रांची सत्यप्रत, कर्मचार्यांच्या जुन्या मान्यता प्रस्तावाचे दप्तर आदी जळून खाक झाले. या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार तात्याबा नगरे करीत आहेत.


