चाळीसगावात जय हनुमान टी हाऊस आगीत खाक


शॉर्ट सर्किटने आग ; 10 लाखांचचे नुकसान झाल्याचा अंदाज

चाळीसगाव : शहरातील स्टेशन रोडवरील जय हनुमान टी हाऊसमध्ये बुधवारी पहाटे शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सुमारे दहा लाखांचे साहित्य खाक झाले. साधुराम गेमनानी यांच्या मालकीचे हे टी हाऊस असून आग लागल्यानंतर पालिकेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.


कॉपी करू नका.