कंडारीत जुन्या वादातून कुटूंबाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
Family assaulted due to old dispute in Kandari : Crime against both भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून विवाहितेच्या डोक्यात वीट मारून दुखापत करण्यात आली तर सासूसह पतीवर चाकू उगारण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या डोक्यात मारली वीट
सुनीता गणेश लोखंडे (35, गणपती मंदिरासमोर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी जुन्या वादातून त्यांच्या डोक्यावर वीट मारून दुखापत केली तर त्यांच्या सासूसह पतीवर चाकू उगारला. या घटनेत तिघे जखमी झाल्यानंतर विवाहितेने शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित हेमंत राजू बाविस्कर व वाल्मीक बंडू तायडे (कंडारी, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.
