वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटक पावडरमुळे दुर्घटना : दोन कामगार जखमी
Accident due to explosive powder in Varangaon Ordnance Factory : Two workers injured भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्फोटक पावडरमुळे दुर्घटना घडल्यानंतर घटनेत दोन कामगार भाजल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत पाटील (तळवेल, ता.भुसावळ) या कामगाराच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने त्यास बर्हाणपूरच्या ऑल ईज वेल रुग्णालयात हलवण्यात आले तर चेतन पाटील या कामगारास किरकोळ दुखापत झाल्याने भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महाप्रबंधकांकडून विचारपूस
वरणगाव ऑर्डनन्समध्ये झालेल्या स्फोटानंतर महाप्रबंधक अजय कुमार सिंग यांच्यासह अन्य अधिकार्यांनी दोन्ही जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली तसेच योग्य ते उपचार करण्याचे आदेश दवाखाना व्यवस्थापनास दिले आहेत. सुरक्षा अधिकारी एस.आर.पाटील यांनी भुसावळ येथे दाखल असलेल्या चेतन पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. हा अपघात कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात. संबधित जखमी कामगारांना फॅक्टरी प्रशासन योग्य पद्धतीने मदत करण्यास बांधील असून अशा घटना टाळण्यासाठी कामगारांना खबरीदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याचे वरणगाव आयुध निर्माणीचे पीआरओ महेश शिंदे यांनी कळवले आहे.
