जळगावात दुचाकी चोरीचे सत्र थांबेना
जळगाव : शहरातील एमआयडीसीतील श्री इंजिनिअरींग कंपनीच्या गेटच्या बाजूला उभी दुचाकी लांबवण्यात आली. या प्रकरणी सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात चोरीचे सत्र कायम
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात विलास बाळू कोळी (30) हे वाहन चालक वास्तव्यास आहेत. बुधवार, 14 जून रोजी विलास कोळी हे दुचाकीने एमआयडीसी परीसरात आल्यानंतर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 बी.डब्लू 2879)श्री इंजिनिअरींग या कंपनीच्या मेनगेटच्या बाजूला उभी केली. काम आटोपून काही वेळातच परतले असता, त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने पाच दिवसानंतर विलास कोळी यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहेत.

