प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून चोपड्यात तरुणावर चाकूहल्ला
Out of anger for helping a love marriage ; a young man was stabbed in a chopper चोपडा : शहरातील एका तरुणावर प्रेमविवाह मदत केल्याच्या रागातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यासह मांडीखाली जबर जखम झाली आहे. या घटनेनंतर व्यापार्यांनी भीतीपोटी आपापली दुकाने बंद केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. दरम्यान, चाकूहल्ल्यात आकाश संतोष भोई हा तरुण जखमी झाला असून संशयित हद्दपार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रेमविवाहाच्या रागातून हल्ला
चोपडा शहरातील साने गुरुजी कॉलनी परीसरात राहणार्या एका तरुणासोबत एका तरुणीने प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाचा मुलीच्या भावाला राग होता. याशिवाय या विवाहाला मदत करणार्या आकाश भोई याच्यावरदेखील मुलीच्या भावाचा राग होता. आकाश भोई हा चोपडा शहरातील साने गुरुजी कॉलनीत आला असल्याची माहिती मुलीच्या भावाला मिळाल्यानंतर पाच ते सहा जणांनी मिळून आकाशवर हल्ला केल्याची माहिती आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर दोन संशयितांना चोपडा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

