जळगाव महापालिकेसमोरच दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
Accident due to two-wheeler hitting the divider ; Death of bike rider in Jalgaon जळगाव : जळगावातील प्रौढाचा दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. जळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिलिंद सोमनाथ पवार (46, रा.शाहूनगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
अपघातात जागीच गमावले प्राण
पवार हे जळगाव शहरातील गोविंदा रीक्षा स्टॉप जवळील जे.के. पानसेंटर कामाला होते. मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास मिलिंद पवार हे दुचाकीने टॉवर चौककडून नेहरू पुतळ्याकडे जात असताना अचानक त्यांचा एका अज्ञात दुचाकीने कट मारल्यानंतर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर वरील इलेक्ट्रिक डीपीच्या पोलवर आढळली. या अपघातात इलेक्ट्रिक डीपीचा लोखंडी खटक्याचा फटका बसल्याने त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई सिंधूबाई, वडील सोमनाथ पवार, भाऊ मनोज व किशोर, पत्नी सुनंदा आणि तीन मुली असा परीवार आहे.

