टोळ्या पुन्हा सक्रिय : शंख घेण्याच्या बहाण्याने बोलावून नांदेडच्या पार्टीला मारहाण करीत साडेसात लाखांचा ऐवज लुटला


The gangs are active again : They called the party of Nanded on the pretext of taking conch and looted seven and a half lakhs मुक्ताईनगर : शंख देण्याच्या बहाण्याने नांदेड येथील पार्टीला मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे बोलावल्यानंतर खोलीत डांबून मारहाण झाल्याची घटना समोर आली असून संशयितांनी समोरील व्यक्तींचा तब्बत साडेसात लाखांचा ऐवज लुटल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. टोळ्या पुुन्हा सक्रिय झाल्याने याबाबत वेळीच पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

यांच्या विरोधात गुन्हा
बसवराज हनुमंतराव बिराजदार (40, गुरुजी चौक, सिद्धीविनायक नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून संतोष अजाबराव पाटील (कुर्‍हा), गणेश उर्फ हकीम रफीक पवार (हलखेडा), मुक्तार भाई, रंजित पवार यांच्यासह 10 ते 12 संशयितांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करीत लूट
संशयितांनी शंख विकत घेण्याचा बहाण्याने बोलावून एक खोलीत डांबून ठेवले तसेच चारचाकी व खिशात असलेली रोख रक्कम चार लाख अडोतीस रुपये तसेच मोबाईल, दीड लाख रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड तीन3 मोबाईल, पंधरा हजार रुपये किंमतीचा लावा मोबाईल, 12 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, एक लाख किमतीचा, आयफोन मोबाईल, 30 हजार रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल, पंचवीस हजार रुपये किंमतीची पुष्कराज कंपनीची घड्याळ, आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,आधार पॅन आणि क्रेडिट कार्ड असे एकूण सात लाख अडोतीस हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडिओ शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !