ट्रान्सफार्मर फोडून 25 हजारांचे कॉईल लांबवले


25 thousand coils were extended by breaking the transformer रावेर : तालुक्यातील पाडळे खुर्द शिवारातील विद्युत रोहित्र फोडून चोरट्यांनी त्यातील 25 हजार रुपये किंमतीचे कॉईल लांबवल्याची घटना गुरुवार, 22 जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
गणेश सुधाकर दहिभाते (31, विद्यानगर, रावेर, ह.मु.हिंगणा कारेगाव, ता.खामगाव) यांच्या फिर्यादीनुसार, पाडळे खुर्द शिवारातील विद्युत रोहित्र फोडत चोरट्यांनी अ‍ॅल्युमिनिअल कॉईल व तांब्याचे रॉड असा एकूण 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात दहिभाते यांनी धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !