शालेय पोषण आहार योजनेची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे द्या


मुख्याध्यापक संघाची मागणी : ‘त्या’ घटनेचा केला निषेध

मुक्ताईनगर- शालेय पोषण आहार योजना जास्तीचे मनुष्यबळ नसताना योग्य पद्धतीने राबून सुद्धा मुख्याध्यापकांची बदनामी होत असल्याने तसेच त्यांचा संबंध नसताना नोटीस बजावण्यात आल्याने या योजनेची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

संंबंध नसताना मुख्याध्यापकांना बजावली नोटीस
शासनाच्या नियमानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना राबवित असताना शाळा स्तरावर अनेक अडचणी येतात. त्या सर्व अडचणी मुख्याध्यापक आपल्या स्तरावर सोडवतात परंतु काही दिवसांपासून शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍या पुरवठादारातर्फे (फेडरेशनतर्फे) तांदूळ व धान्य आदी वेळेवर प्राप्त होत नसून आल्यास कधी कमी तर कधी जास्त असते. प्रशासनाच्या सूचनेनुसार तशी पावतीवर गोल खून करून किती माल घेतला तसे नोंदविण्यात येते व रेकॉर्ड नुसार गटशिक्षणाधिकारी तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्यामार्फत तपासणी केली जाते. अशा प्रकारे सर्व रेकॉर्ड बरोबर असतानासुद्धा तालुक्यातील काही मुख्याध्यापकांना त्यांचा काही संबंध नसताना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामुळे मुख्याध्यापकांची नाहक बदनामी झाली असून त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळत आह. त्यामुळे अशा घटनेचा आम्ही निषेध करीत असून शालेय पोषण आहार योजना चांगली राहून सुद्धा बदनामी होत असल्यास ती यापुढे का चालवावी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.




यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्यातर्फे केंद्रप्रमुख राजू तडवी यांनी स्वीकारले. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील मुख्याध्यापक एन.आय.पाटील, पी.पी.दाणे, ए.के.सूर्यवंशी, डी.के.पाटील, एन.एस.पोपे, एस.एस. पाटील, आर.जे.कौलकर, एस.डी.ठाकूर, व्ही.एस.चौधरी, एस.एच.भोई, एन.एस.पवार, एन.पी.भोंबे, संदीप पाटील, आर.एस.पाटील, एन.डी.काटे, आर.पी.पाटील, एस.डी.पाटील, के.एन.चौधरी, आय.आय.शाह, पी.डी.महाजन आदी मुख्याध्यापकांसह उपशिक्षक डी.एम.फेगडे, महेंद्र तायडे, आर.के.पाटील आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !