जळगावातील रीक्षा चालकाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू
A rickshaw driver in Jalgaon died after being hit by a train जळगाव : शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या रीक्षा चालकाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना पिंप्राळा हुडको सबस्टेशन जवळ शनिवार, 1 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय नारायण जाधव (58, बौध्द वसाहत, पिंप्राळा, जळगाव हुडको) असे मयत रीक्षा चालकाचे नाव आहे.
रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोमधील बौध्द वसाहतीत संजय जाधव हे आपल्या पत्नी, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. प्रवाशी रीक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे शनिवार, 1 जुलै रोजी रात्री उशीरा संजय जाधव हे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. पिंप्राळा हुडकोतील सबस्टेशनजवळील रेल्वे खांबा क्रमांक 417 च्या 28 ते 26 दरम्यान अज्ञात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यंत संजय जाधव हे घरी न आल्याने शोध सुरू असताना जळगाव रेल्वेचे उपप्रबंधक यांनी ही माहिती रामांनद नगर पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि लहान भाऊ असा परीवार आहे. तपास पोलीस कर्मचारी निलेश पाटील करीत आहे

