फुलगाव शिवारात परप्रांतीय तरुणाचा खून : फुलगावच्या चौघा शेतकर्यांना अटक
इलेक्ट्रीक वायर्स चोरीचा संशय बेतला जीवावर : संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
Murder of migrant youth in Phulgaon Shivara: Four farmers of Phulgaon arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारात शेतातील इलेक्ट्रीक वायर्स चोरीच्या संशयातून शेतकर्यांनी बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. शेतकर्यांनी प्रकरण अंगलट न येण्यासाठी मयताचे कपडे काढून मृतदेह हलवला मात्र वरणगाव पोलीस व जळगाव गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत या गुन्ह्याची उकल करीत फुलगावच्या चौघा शेतकर्यांना बेड्या ठोकल्या. संशयिताना सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंकज रामचंद्र सोनवणे (20, धामणगाव, ता.शहापूर, जि.बर्हाणपूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
चौघा शेतकर्यांना अटक
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजय सुधाकर चौधरी (40), संतोष मुरलिधर कोलते (52)ख अविनाश पुंडलिक पाटील (54), सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (45, फुलगाव, ता.भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारेख प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, कमलाबर बागुल, अनिल देशमुख, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, दीपक पाटील तसेच वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी, नाईक अतुल बोदडे
कॉन्स्टेबल सुखराम सावकारे आदींच्या पथकाने केली.
