मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षकपदी सुरेश जाधव

राज्यातील 40 उपअधीक्षक/सहा.आयुक्तांच्या बदल्या
भुसावळ- राज्यातील 40 उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी बुधवार, 14 रोजी काढले आहेत. त्यात मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षकपदी नाशिक मुख्यालयातील उपअधीक्षक सुरेश वळू जाधव यांची बदली झाली असून मुक्ताईनगरचे उपअधीक्षक संजय गुलाबराव देशमुख यांची जळगाव मुख्यालयातील उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. चाळीसगावचे उपअधीक्षक उत्तम दामोदर कडलग यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर ग्रामीण मुख्यालयातून कैलास निवृत्तीराव गावडे बदलून येत आहेत. शिरपूर विभागाच्या उपअधीक्षकपदी पांढरकवडा पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनिल वामन माने यांची बदली करण्यात आली आहे.
