प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणार : यावलचे नूतन प्रकल्प अधिकारी अरुण पवार
Will bring transparency in administrative work : Salt project officer of Yaval Arun Pawar यावल : यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांची बदली झाल्यानंतर रीक्त जागेवर अरुण प्रभाकर पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. पवार हे यापूर्वी रायगड येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार
यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांची पदोन्नती झाल्यानंतर त्या नाशिक विभागीय कार्यालयात उपायुक्त म्हणून नियुक्त झाल्या. त्यांच्या रीक्त असलेल्या या जागेवर प्रकल्प अधिकारी म्हणून रायगड येथून अरुण प्रभाकर पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे कामकाज पाहत असतांना गोर-गरीब गरजवंत आदिवासी बांधवांच्या पदरात शासकीय योजनांचा लाभ पाडत त्यांच्या विकासाकरीता आपण कटिबद्ध राहू तसेच पारदर्शकपणे प्रशासकीय कामकाजाकरीता आपण प्रयत्नशील राहू, असे प्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सांगितले.

