Trafficking of minor girl stopped by railway security in Bhusawal भुसावळात रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी रोखली अल्पवयीन मुलीची तस्करी : युपीतील महिलेला अटक
Trafficking of minor girl stopped by railway security in Bhusawal : Woman from UP arrested भुसावळ : अप 22537 कुशीनगर एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी- 1 मधून एक महिला अल्पवयीन मुलीची अपहरण करून तस्करी करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता एएसआय प्रेम चौधरी, कॉन्स्टेबल अलीशेर, जे.पी.मीना, लोहमार्गचे हवालदार सुधीर पाटील, समतोल प्रकाश महाजन यांनी महिलेसह अल्पयीन मुलीला भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी येताच ताब्यात घेत लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. शबाना (22 पाकरी, जि.बस्ती, उत्तरप्रदेश) असे अटकेतील महिलेचे नाव असून तिच्याविरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मानवी तस्करीचा गुन्हा दाखल
भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक विजय खेर्डे यांनी महिलेची सखोल चौकशी केली. ग्यानदास, गणेशपूर, जि.नाम येथील अल्पवयीन मुलगी रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत असताना शबाना या महिलेने तिला मुंबईला नेण्याचे आमिष दाखवले. पीडीता अल्पवयीन असल्याने तिने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र रेल्वे सुरक्षा यंत्रणांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर मुलीची सुटका करण्यात आली तर महिलेला मात्र अटक करण्यात आली. अधिक तपास
लोहमार्गच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे करीत आहेत.
