भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची आरोग्य तपासणी
भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.नारखेडे विद्यालयात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची रक्तशर्करा तपासणी शनिवारी करण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे व अर्चना नारखेडे यांनी संस्थेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात जाणीव-जागृती व्हावी आणि कर्मचारी मानसिक व शारीरीकृद़ृष्ट्या या सक्षम रहावे या अनुषंगाने रक्तशर्करे संदर्भात स्वत: प्रत्येक शिक्षक बंधू-भगिनींची ब्लड शुगरची तपासणी करवून घेतली शिवाय त्यांना या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन आणि सूचना केल्या.
स्वतः संस्था अध्यक्ष यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक नितीन किरंगे, वाय.एन.झोपे, ए.एल.राणे, प्रमोद तळेले, बी.ए.पाटील, शिक्षक सुनील पाठक आदींची उपस्थिती होती.

