भुसावळात तृतीयपंथीयासोबत अनैसर्गिक कृत्य : पाच संशयितांविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील एका भागातील जोगवा मागणार्‍या 32 वर्षीय तृतीयपंथीयाला मारहाण करीत अनैसर्गिक कृत्य करून खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी बंटी पथरोडसह पाच जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पाच संशयितांविरोधात गुन्हा
32 वर्षीय तृतीयपंथीयाने दिलेल्या तक्रारीनुसार, 31 मे 2022 रोजी सायंकाळी सात वाजता संशयित बंटी पथरोड याने त्याच्या वाल्मीक नगर, 72 खोली भागातील घरी नेत अनैसर्गिक कृत्य केले तर सोबतच्या चौघांनी दिड हजार रुपये हिसकावून घेतले तसेच दररोज सातशे रुपये हिस्सा खंडणीपोटी न दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बंटी पथरोडसह फज्जो उर्फ सोनी पथरोड, माया डॉन (पूर्ण नाव माहित नाही), हर्षल पाटील, जितू उर्फ ज्योती जान यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !