पाणीटंचाईच्या निषेधार्थ वरणगावात मुख्याधिकार्यांच्या खुर्चीला घातला हार
ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरीकांची भटकंती : प्रशासनाविषयी संताप
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे भर पावसाळ्यात नागरीकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी 12 वाजता वरणगाव नगरपंचायतीवर मोर्चा काढला मात्र पालिकेत मुख्याधिकार्यांसह कुणीही जवाबदार अधिकारी नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी मुख्याधिकारी यांच्या रीरकाम्या खुर्चीला हार टाकला.
20 दिवसांपासून पाणीटंचाईचे चटके
वरणगाव शहरात गेल्या 20 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाई का निर्माण झाली? पाणी कधीपर्यंत येईल? शहरातील नागरिकांना कधी पाणी भेटेल ? याबाबत विचारणा करण्यासाठी नगरपरीषदेत गेल्यानंतर या ठिकाणी मुख्याधिकार्यांसह कोणीही जबाबदार अधिकारी नसल्यानें संतप्त शिवसैनिकांनी मुख्याधिकारी समीर शेख यांच्या रीकाम्या खुर्चीला हार टाकला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख संतोष माळी, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, महिला संघटिका योगीता सोनार, आबा सोनार, उपशहर प्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, अशोक शर्मा, सुनील भोई, शाखाप्रमुख प्रमुख संजीव कोळी, शेख सत्तार, शिवा भोई, प्रल्हाद माळी, हनीफ कच्ची, इरफान खान, गोली भोई, योगेश सतावकर, शुभम आमोदकर, नाथ चौधरी, मोहन धनगर, किरण मराठे, योगेश कोळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
