न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्यस्थी हे प्रभावी शस्त्र

अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.टी.सूर यांचे मत


Mediation is an effective weapon in court proceedings भुसावळ : पूर्वी गावातील लोक वेगळे होण्यासाठी न्यायालयात कधीही जात नव्हते, कोर्टाची पायरी चढत नव्हते. आपसात आणि मध्यस्थीच्या मार्फतच घरातील वाद विवाद सोडवत होते. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थी हे प्रभावी शस्त्र असल्याचे मत भुसावळ अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.टी.सूर यांनी केले. तालुका विधी सेवा समिती आणि भुसावळ वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने 31 जुलै रोजी न्यायालयामध्ये मध्यस्थी जनजागृतीसाठी कार्यक्रम राबविण्याबाबतच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी वरीष्ठ स्तर दिवाणी न्या.हेमा पाटील, भुसावळ तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, सचिव अ‍ॅड.पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड.तुषार पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका ही पौराणिक काळापासून सुरू आहे. रामायणातील राम आणि रावण यांच्यात मध्यस्ताच्या भूमिकेचे वर्णन सांगितले. न्यायालयीन वादात मध्यस्थीची भूमिका ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. दिवाणी वरीष्ठ स्तर न्या.हेमा पाटील यांनी दिवाणी संहिता कलम 89 नुसार सेटलमेंट ऑफ आऊटसाईड कोर्टच्या संदर्भात सांगताना वैकल्पिक वाद निवारणात आरबी टेशन, कन्सिलेशन, लोक न्यायालय आणि मध्यस्थ यांची भूमिका ही महत्वाची असते, असे सांगितले. पक्षकारांचा वेळ वाचविणे, मानसिक ताण कमी करणे याकरीता भुसावळ वकील संघाने पुढाकार घेणे व सर्व वकिलांनी सहकार्य करणे याबाबत त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भुसावळ वकील संघातील सर्व वकील, विधी सेवाचे सतीश पाटील, कमलाकर जावळे न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.रमेश पांडव यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !