नर्मदा परीक्रमावासी कधीही राहत नाही भुकेला : डॉ.नि.तू.पाटील


Narmada Parikrama residents never live hungry: Dr.N.Tu.Patil भुसावळ : माँ नर्मदेची परीक्रमा करीत असताना आटा (पीठ), भाटा (दगड) आणि काटा (जळाऊ काड्या) कधीच कमतरता नसल्याने परीक्रमवासी हा कधीही भुकेला राहत नाही, हा इतिहास आहे, असे विचार परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांनी आयएएमच्या साप्ताहिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात व्यक्त केले.डॉ.पाटील यांनी 108 दिवसात पायी तीन हजार सातशे किलोमीटरचा टप्पा पार करत माँ नर्मदा परीक्रमा पूर्ण केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी भुसावळ अध्यक्ष डॉ.मिलिंद धांडे, खजिनदार डॉ.ओमप्रकाश चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.पाटील म्हणलो की, चातुर्मासमध्ये चालणारा मी एकमेव रेवा खंडात होतो पण ही माँ नर्मदा मातेचीच इच्छा होती. यावेळी डॉ.नितु पाटील आणि डॉ.रेणुका पाटील यांचा सपत्नीक सत्कार डॉ.प्रदीप नाईक यांच्याहस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ.संज्योत पाटील, डॉ.दीप्ती चौधरी तर आभार डॉ.मिलिंद धांडे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !