केळी चोरी करणार्या कोळन्हावी येथील पाच जणांची कोठडीत रवानगी
Five people from Kolnhavi, who stole bananas, were sent to custody यावल : तालुक्यातील कोळन्हावी शेतशिवारातून पाच जणांनी केळीच्या शेतातून केळी घड चोरी केल्यानंतर यावल पोलिसांनी त्यांनी अटक केली. संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाच संशयितांनी 28 केळीचे घड चोरी केल्याचा आरोप आहे.
28 केळी घड लांबवल्याप्रकरणी कारवाई
कोळन्हावी, ता.यावल या शेतशिवारात शांताबाई कमलाकर तारे यांचे शेत गट क्रमांक 2/1 आहे. हे शेत चंद्रकांत विठ्ठल चौधरी (किनगाव बुद्रुक) हे कसतात. त्यांच्या शेतातून कापणीयोग्य झालेले 28 केळीचे घड संशयित विनोद मच्छिंद्र सोनवणे, धनराज प्रल्हाद सोळुंके, मधुकर नथू सोळुंके, योगेश भरत सोळुंके व एकनाथ आधार सोळुंके (सर्व राहणार कोळन्हावी, ता.यावल) यांनी चोरी करून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व पाच जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्यासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.








