चिंचोली गावातील मरीमाता मंदिरासमोरून ट्रकची बॅटरीसह साहित्याची चोरी
Theft of material including battery from truck in front of Marimata temple in Chincholi village यावल : यावल तालुक्यातील चिंचोली येथील मरीमाता मंदिरा समोरून अज्ञात चोरट्याने ट्रकची बॅटरी, ताडपत्री व प्रेशर जॅक असे साहित्य लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण 11 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
चिंचोली, ता.यावल या गावात मरीमाता मंदिरासमोर समाधान डिगंबर धनगर यांनी आपले ट्रक लावले होते. या ट्रकमध्ये असलेली बॅटरी तसेच ताडपत्री व प्रेशर जॅक असा 11 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीनंतर लांबवला. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर समाधान धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहे.








