डांभूर्णी गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेत आत्महत्या
A 17-year-old boy from Dambhurni village committed suicide by hanging himself यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील गावठाण जागेवर असलेल्या आदिवासी वस्तीत ही घटना घडली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुकेश नरसिंग बारेला (17) असे मयताचे नाव असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
डांभूर्णी, ता.यावल येथील गावठाण जागेवर आदिवासी वस्ती असून या वस्तीतील रहिवासी मुकेश नरसिंग बारेला (17) याने घरी असताना आपल्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थांनी वस्तीवर धाव घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी तपासणी करून अल्पवयीन मुलाचा मृत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे अल्पवयीन मुलाने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.








