यावल शहरातील सुतार वाड्यात 52 वर्षीय शेतकर्याची आत्महत्या
A 52-year-old farmer committed suicide at Sutar Wada in Yaval city यावल : शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी एका 52 वर्षीय शेतकर्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी निदर्शनास आला व त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येने शहरात खळबळ
यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत सुतार वाडा असून या भागात गोकुळ भिका सपकाळे (52) वास्तव्यास होते. शेतकरी दुपारी घरी असताना त्यांची पत्नी शेतात कामाला गेल्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतकर्याने गळफास घेतला. हा प्रकार निर्दशनास येताच तातडीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संदीप कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.








