मोहराळ्यातील 33 वर्षीय तरूणाची आजाराला कंटाळून आत्महत्या


A 33-year-old youth in Mohrala committed suicide due to illness यावल : यावल तालुक्यातील मोहराळा येथील एका अविवाहीत 33 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निर्दशनास येताचं त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तम उर्फ छोटु भोजु पाटील (33) असे मयताचे नाव आहे.

दीर्घ आजाराला कंटाळून उचलले पाऊल
उत्तम हा अविवाहित तरुण आपल्या घरी एकटा होता व तो दीर्घ आजाराने कंटालेला होता. तसेच विवाह होत नाही म्हणून नैराश्यापोटी दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. याचं नैराश्यातुन त्याने 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार निर्दशनास येताचं त्याला यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. मयताचे भाऊ यशवंत त्र्यंबक पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !