सावदा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग : मुख्य आरोपीला बेड्या
Rape of minor girl in Sawada : Main accused in chains सावदा : शहरातील एका शाळेत अल्पवयीन बालिकेशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान यास सावदा पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्य संशयिताला अखेर अटक
सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनी संशयिताला 14 रोजी रात्री अटक केली. संशयिताला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयित अक्रम खान याने शाळेतील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याचा आरोप असून या कृत्याबाबत माहिती दिल्यानंतर शिक्षकांनही मौन बाळगल्याने त्यांच्याविरोधातही सावदा पोलिसात गुन्हा दाखल आहे.








