रावेरात पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकारी धारेवर
सर्वसामान्यांना अधिकार्यांनी फिरवल्यास गाठ माझ्याशी : आमदार चंद्रकांत पाटील यांनी भरला दम
Officials at the review meeting of Ravera Panchayat Samiti रावेर : केंद्र आणि राज्य सरकार तळागाळातील लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजनांना राबवित आहे. घरकुल योजना व अन्य योजनांचा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेरातील आढावा बैठकीत केले. यावेळी शासकीय कार्यालयात कामे घेवून येणार्या नागरीकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदारांनी आढावा बैठकीतच अधिकार्यांना खडे बोल सुनावले. सर्वसाधारण नागरीकांची अडवणूक करू नका, तत्काळ नागरीकांची कामे करा, अशा सूचनाही आमदारांनी यावेळी दिल्यानंतर अधिकार्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. पंचायत समितीच्या अधिकार्यांना आमदारांनी धारेवर धरल्यानंतर सभेत चांगलीच खळबळ उडाली.
यांची विचार मंचावर उपस्थिती
रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या सभागृहात रावेर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्या संदर्भात प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली.व्यासपीठावर आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार बी.ए.कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, वनक्षेत्रपाल अजय बावणे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, संतोष महाजन, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या विषयांवर बैठकीत झाली चर्चा
यामध्ये सर्वसाधारण जनता तसेच शेतकरी प्रशासकीय बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यामध्ये घरकुल घेणारे गरीब लाभार्थीना वाळू मोफत द्यावे, घरकुल योजनेचा आढावा, गोठा योजना संदर्भात वाढलेल्या तक्रारी, अपंग निधी खर्च संदर्भात तपशील, पीएम किसान योजनेला येणार्या अडचणी, रस्ते संदर्भात तक्रारी, रेशन धान्य योजनेच्या समस्या, उतारे नावावर न लावण्याच्या तक्रारी, ग्रामीण बससेवा तक्रारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तक्रारी या आढावा बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोडवण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्यांना दिल्या.
यांची होती बैठकीला उपस्थिती
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व्ही.के.तायडे, एम.बी.चौधरी, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कृषी अधिकारी बी.सी.वाळके, सचिन पाटील, आर.के पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी नागरीक उपस्थित होते.
