शेतीसाठी 50 हजार रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ


Harassment of married for not bringing 50 thousand rupees for agriculture भुसावळ : शेती करण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने कंडारी येथील माहेर व सातपूर नाशिक येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
हिना एजाज पिंजारी (26, महादेव टेकडीजवळ, कंडारी, हल्ली रा.लाल बिल्डींग, अक्सा कॉलनी कंडारी) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी शेती कसण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने शारीरीक मानसिक छळ केला तसेच वेळोवेळी मारहाण करीत शिविगाळ केली. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती एजाज ईकबाल पिंजारी, सासरे ईकबाल गंभीर पिंजारी, सासू ईम्तियाज ईकबाल पिंजारी, दीर फैयाज ईकबाल पिंजारी, दिराणी रेहाना उर्फ निलोफर फयाज पिंजारी (सर्व रा.महादेव टेकडीजवळ, कंडारी, ता.भुसावळ), नणंद रुकसार अमीन पिंजारी (सातपूर, जि.नाशिक), चुलत सासरे मुक्तार पिंजारी, अक्तर पिंजारी (विवरे खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक पराग सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !