अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार : आरोपीला 20 पर्यंत पोलिस कोठडी
चोपडा : तालुक्यातील वैजापूर गावाजवळील एका शेतात दोघा अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी देवेंद्र राजेंद्र मोरे (भोई, 24, वैजापूर, ता.चोपडा) यास अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पीडीतेवर सामान्य रुग्णालयात उपचार
पाच व सहा वर्षीय चिमुकली शौचाला जात असताना संशयीत आरोपी देवेंद्र मोरे याने दुचाकीवर बळजबरीने बसवून नेत वैजापूर-मेलाणे रस्त्यावरील एका शेतात अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. यावेळी एक चिमुकलीने प्रसंगावधान राखत पळ काढल्याने ती बचावली. दरम्यान, अत्याचार झालेल्यांपैकी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्यावर आता जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल करीत आहेत.