भुसावळात आजपासून दहा दिवसांनी होईल पाणीपुरवठा


Water supply will be done in Bhusawal after ten days from today भुसावळ : कालबाह्य पाणीपुरवठा यंत्रणेचे नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून तांत्रिक काम करताना अशुध्द व शुध्द पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असून विद्युत पुरवठा खंडीत होवून पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होत आहे. यामुळे आता शहरातील सर्व भागांना सोमवार, 21 दहा दिवसांआड पाणीपुरवठा होईल, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले.

शहरात आजपासून दहा दिवसाआड येणार पाणी
शहरातील काही भागांना 12 तर काही भागांना आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता मात्र पाणीपुरवठ्याचा ताळमेळच बिघडला आहे. अनेक भागांमध्ये 14 ते 16 दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नाही. शहरातील जलशुध्दीकरण यंत्रणेवर नुतनीकरणाचे काम सुरू आहे. यात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने सोमवार, 21 ऑगस्टपासून सर्व भागातील पाणीपुरवठा दहा दिवसांनी केला जाणार आहे. याचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार आहे. लवकरच नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नियोजीत वेळापत्रक नियमित करून पाणीपुरवठ्याचे दिवस कमी केले जातील, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितलेे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !