गुलाबरावांच्या सूचनेचे स्वागत -माजी मंत्री एकनाथराव खडसे
ज्यांच्यावर उपकार केले त्यांनीच दगा दिल्याची व्यक्त केली खंत
भुसावळ : नाथाभाऊंनी सोबत ठेवलेल्या लोकांचा रक्तगट कधी तपासला नाही त्यांनी रक्तगट तपासून माणसेठेवली असत, तर गुलाबराव पाटलांसारखा सच्चा माणूस कधीही तुटला नसता मात्र असे असलेतरी नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं मात्र मुलगा कधी मानलं नाही त्यामुळे त्यांच्यावर ही वाईट वेळ आली, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळात रविवारी आयोजित सत्कारप्रसंगी लगावला होता. गुलाबरावांच्या या टोलेबाजीनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, गुलाबरावांनी रक्तगट तपासून कार्यकर्ते नेमायला हवेत होते ही सूचना रास्त आहे कारण मी सर्वांनाच भरभरून प्रेम दिले मात्र ज्यांच्यावर उपकार केले त्यांनीच दगा दिला, अशी कबुलीही खडसे यांनी दिली.
गुलाबरावांच्या विधानाने खळबळ
शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं मात्र मुलगा कधी मानलं नाही त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. कधीही साथ सोडली नसती व माझ्यासारखा सच्चा माणूस तुटला नसता व तुटू शकणारही नाही. लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो माझी मागची दुश्मनी काढली नाही. मला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाहायचं होतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.


खडसे म्हणाले, गुलाबरावांच्या सूचनेचे स्वागत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर माजी मंत्री खडसे म्हणाले की, मी सर्वांनाच भरभरून प्रेम दिले आहे, गुलाबरावांना आपण मुलाचे प्रेम दिले मात्र मी त्यांची साथ सोडली नाही तर भाजपाने साथ सोडल्याने ते वेगळे झाल्याचे खडसे म्हणाले. काही कार्यकर्ते रक्तगट तपासून नेमायला हवे होते या गुलाबरावांच्या सूचनेचे मी स्वागत कारतो कारण ज्यांच्यावर मी उपचार केले त्यांनीच आपल्याला दगा दिल्याचे खडसे म्हणाले.
