वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्चाने रावेर दणाणले
रावेर : शहरात वंचित बहुजन आघाडीतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पक्षाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
या मागण्यांचे प्रशासनाला निवेदन
केंद्र सरकार असो व राज्य सरकार असो.एस.सी, एस.टी. ओबीसी मुलांना परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, 2019 वर्षाचा रावेर शहरातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता तात्काळ देण्यात यावा, 8 जून 2023 रोजी रावेर तालुक्यात वादळी वार्यासह व पावसामुळे घरांचे व शेती केळी पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धापकाळ, अर्थसहाय्य, श्रावण बाळ या योजनेची रक्कम दर महिन्याला देण्यात यावी, रावेर येथील गट नंबर 494 कब्रस्तान छपरी बंद फकीर समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, गायरान जमिनी संदर्भात 20 जुलै मुंबई येथे महामोर्चामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर विधान भवन येथे चर्चा होऊन गायरान जमिनीचा प्रश्न मंजूर झालेली मागणी असून रावेर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व सर्कल यांनी लोकांना त्रास देऊ नये आदी मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले.

यांचा मोर्चात सहभाग
रावेर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर निवासी नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे ,युवक प्रदेशचे सदस्य शमीभा पाटील, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, जिल्हाध्यक्ष कामगार बालाजी पठाडे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजर, जिल्हा उपाध्यक्ष शेख रफिक बेग, तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, तालुका संघटक कंदरसिंग बारेला, अर्जुन वाघ, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, दौलत अडांगळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे, देवदत्त मकासारे, कैलास तायडे, शिवा बेल्लार, प्रकाश तायडे तसेच रावेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडो महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले.
